ऑनलाईन कृषी माहिती सुविधा

शेतकऱ्यांच्या सेवेसाठी

100 कोंबड्यांपासून सुरु झालेल्या साताऱ्यातील जाधव पोल्ट्री फार्म लघुउद्योगाची वाटचाल रोजचे 14000 अंडी उत्पादित करणाऱ्या 4 पोल्ट्री फार्म्स कडे

मनुष्य असो अथवा कोणताही सजीव, अन्न हे महत्वाचे, प्रथिने तीही उत्तम दर्जाची हवी असल्यास त्यासाठी जाधव फार्म आम्ही पुरवितो शाहाकारी अंडी, सेंद्रिय भाजीपाला, सेंद्रिय शेती उत्पादने आणि मांसाहारी लोकांसाठी दर्जेदार मांस शेळ्यांचे.

सन 1996 पासून 100 कोंबड्यापासून सुरू झालेला हा लघुउद्योग आज त्याची व्यापी वाढत आहे. प्रकल्पाचे सर्वेसर्वा, स्थापना ज्यांनी केली ते श्री प्रकाश रामचंद्र जाधव यांनी सर्व शक्ती पणाला लावून हा प्रकल्प उभा केला आहे. आज आम्ही निसर्गाच्या कुशीत, स्वच्छ सुंदर हवामानात सडावाघापूर घाट, दुसाले गावात ता.पाटण जि. सातारा येते कार्यरत आहोत.

कोणत्याही सजिव प्राणी जगण्यासाठी पोषक हवामान महत्वाचे, समुद्रसपाटीपासून 4000 फुट उंचावर असलेले दुसाले हे गाव समृद्ध वनसंपदा आणि प्रदूषण मुक्त हवा यांमध्ये वाढलेल्या कोंबड्या आणि शेळ्या या उत्तम दर्ज्याची अंडी आणि मांस उत्पादित करतात.

संपूर्ण सेंद्रिय खाद्यापासून तयार झालेली अंडी, मांस हे रसायन मुक्त ( Antibiotic Free) उत्तम चवीचा प्रथिने असल्याने, आरोग्याची हानी थांबवता येईल. या धकाधकीच्या जीवनात योग्य मोबदल्यामध्ये आमचे चार पोल्ट्री फार्म जे रोजचे 14000 अंडी उत्पादित करतात त्यांचे उत्तम किरकोळ बाजारात बांधील असणारे विक्रेत्यांचे जाळे सातारा शहरालगत आम्ही तयार केले आहे.

प्रधान मंत्री फसल बीमा योजना

योजनेची उद्दीष्टे:

 • नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांचा परिणाम म्हणून कोणत्याही सूचित पिकाचे अपयश झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण व आर्थिक सहाय्य देणे.
 • शेतकर्‍यांची शेती सुरू ठेवण्यासाठी त्यांचे उत्पन्न स्थिर करणे.
 • शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व आधुनिक शेती पद्धती अवलंबण्यास प्रोत्साहित करणे.
 • कृषी क्षेत्राला पतपुरवठा सुनिश्चित करणे.

अधिक माहितीसाठी https://pmfby.gov.in या पोर्टल ला भेट द्या किंवा क्लिक करा.

तंत्रज्ञानाचा प्रसार केल्यास कृषी क्षेत्राला चालना मिळेल

देशातील 1.3 अब्ज लोकसंख्येच्या निम्म्याहून अधिक लोकसंख्येचे शेती हे जगण्याचे साधन आहे.

असे असून देखील भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनापैकी केवळ 15% वाटा कृषी क्षेत्राचा आहे.

तंत्रज्ञानाचा प्रसार केल्यास कृषी क्षेत्राला चालना मिळेल.

जगात आंबा उत्पादनात भारत देशाचा प्रथम क्रमांक येतो.

भारत देशाचे वार्षिक आंब्याचे उत्पादन १८ मिलियन टनांपेक्षा जास्त आहे, जे जागतिक आंबा पुरवठ्याच्या अंदाजे ५०% आहे.

आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र आणि ओरिसा ही आंबे उत्पादित करणारी प्रमुख राज्ये आहेत.

प्रधान मंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान)

प्रधान मंत्री किसान सन्मान निधी ही एक मध्यवर्ती योजना 1 डिसेंबर 2018 पासून लागू करण्यात आलेली आहे.

या योजनेंतर्गत देशभरातील सर्व शेतकरी कुटुंबांना वर्षाकाठी रु. 6000/- चे उत्पन्न आधार दिले जाते. हा निधी दर चार महिन्यांनी तीन समान हप्त्यांमध्ये रु. 2000/- थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या पती, पत्नी आणि अल्पवयीन मुले आहेत.

या योजनेंतर्गत नावनोंदणी पुढे दिलेल्या तीन प्रकारांपैकी एका प्रकारातून करता येईल:

 1. नावनोंदणीसाठी शेतकऱ्याने राज्य सरकारद्वारे नामित स्थानिक पटवारी / महसूल अधिकारी / नोडल ऑफिसर (पीएम-किसान) यांच्याकडे संपर्क साधावा.
 2. सामान्य सेवा केंद्रांना (सीएससी) देखील फी भरल्यानंतर योजनेची नोंदणी करण्यासाठी अधिकृत करण्यात आले आहेत.
 3. शेतकरी https://pmkisan.gov.in या पोर्टलमध्ये शेतकरी कॉर्नर माध्यमातून स्वत:ची नोंदणी देखील करु शकतात.

लाभार्थी शेतकरी कुटुंबांच्या ओळखीची संपूर्ण जबाबदारी राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारवर अवलंबून आहे.

अधिक माहितीसाठी https://pmkisan.gov.in या पोर्टल ला भेट द्या किंवा क्लिक करा.

पीएम-किसान हेल्पलाईन क्रमांक : 155261 / 1800115526 (टोल फ्री), 0120-6025109

ऑनलाईन कृषी माहिती सुविधा आता थेट शेतकऱ्यांपर्यंत

आपले सरकार किसान वर्गासाठी कृषीविषयक विविध योजना, अनेक कार्यक्रम व नवीन उपक्रम राबवित आहे. या सर्व गोष्टी शेतकऱ्यांसाठी खूप लाभदायक आहेत. असे असून देखील या गोष्टींची माहिती अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहचली जात नाही असे आमच्या संशोधनातून समजले आहे.

अशा अनेक गोष्टींची माहिती थेट शेतकऱ्यांच्या मोबाईल मध्ये उपलब्ध व्हावी यासाठी agriculture.altegicagro.com हा डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केलेला आहे. या प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी मित्रापर्यंत कृषी विषयक माहिती पुरविण्याचा ध्यास अल्टेजिक कंपनी ने हाती घेतला आहे.

या प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून पुढील प्रकारची माहिती वेळोवेळी उपलब्ध करून दिली जाईल:

 • कृषी विषयक योजना
 • कृषी विषयक बातम्या
 • कृषी विषयक प्रकल्प
 • कृषी विषयक कार्यक्रम
 • उत्तम कृषी पद्धती
 • संबंधित लिंक्स
 • इ.

सर्वात महत्वाचे म्हणजे, कृषी क्षेत्रातील नवीन गोष्टींचा प्रसार केल्यामुळे, शेतकऱ्यांना तसेच कृषी संबधी निगडीत लोकांना आधुनिक पद्धतींशी अद्ययावत राहण्यास व कृषी उत्पादकता वाढवण्यास मदत होईल.